आपले सामान्य ज्ञान(General Knowledge) पडताळून पाहा
- अगामा ही आफ्रिका खंडामध्ये सर्वत्र खडकाळ वाळवंटि प्रदेशात आढळणारी पालीची जात आहे.
- अगाउ ही इथिओपियन पठाराच्या उत्तर व मध्य भागांमध्ये आढळणारी प्रचीन जमात आहे.
- अग्नाथा (हल्लींची अगौटी) ही अमेरिकेतील विषुववृत्तीय भागात आढळणारी घुशीची जात आहे.
- ‘एअरंडेल टेरिअर’ हीटेरिअर जातीच्या कुत्र्यांची सर्वात मोठ्या आकारांची जात आहे.
- जिओव्हानी आग्नेली हे फियाट मोटर कंपनीचे संस्थापक होते.
- ऍग्न्स डेई हे येशू ख्रिस्ताचे ख्रिश्चन धर्मोपासनेतील संबोधन आहे.
- जॉर्जियस ऍग्रिकोला, याजर्मन शास्त्रज्ञाला 'खनिजशास्त्राचे जनक म्हणतात.
- ‘केप ऍगुल्हास’ हे आफ्रिका खंडाचे दक्षिण टोक आहे.
इतिहास
- ख्रिस्तपूर्व सहाव्या व पाचव्या शतकांमध्ये झालेल्या गंगा खोऱ्यातील सत्तासंघर्षामध्ये सर्वात प्रबळ ठरलेले मगध राज्य होय.
- बिहार मधील सासाराम येथे शेरशहा सूर या मध्ययुगीन सम्राटाची कबर आहे.
- इ.स.१८३१ ते१८८१ या कालावधीत्र ब्रिटिश प्रशासनाचे मुख्यालय बंगळूर येथे होते.
भुगोल
- 'बोकारो' व 'कोणार' या नद्या पूर्व भारतातील दामोदर नदीच्या उपनद्या आहेत.
- नव्या झारखंड राज्याची राजधानी रांची आहे.
- सांभर भारतातील सर्वात मोठे अल्पकालीन खारे सरोवर आहे.
खेळ
- कुस्ती या क्रीडाप्रकारात प्रतिस्पर्थ्याचे खांदे जमिनीला टेकवायचे असतात.
- व्यापार हा खेळ अमेरिकेत सुरू झालेला व खाजगी पेटंटाखाली जगभर सर्वात जास्त मागणी असलेला स्थावर संपत्तीविषयक पटाचा खेळ होय.
- हेरॉल्ड लारवूड हा चौदाव्या वर्षापासून कोळसा खाणीत काम केल्यानंतर ते काम सोडून ट्रेंटा बिज, नॉटिगहॅम येथे मैदानावरील कर्मचारी म्हणून काम करणारा ब्रिटिश क्रिकेटपटू होय.
साहित्य आणि कला
- राम लक्ष्मणांना भुलवून दूर नेणाऱ्या रामायणातील सोनेरी हरणाचे नाव मारीच होते.
- शैवपंथियांचे, पवित्र धर्मग्रंथ असलेल्या मध्ययुगीन भारतातील हिंदू तंत्रग्रंथांना आगम म्हणतात.
- ऋग्वेद हा सर्वात प्राचीन हिंदू धर्मग्रंथ आहे.
विज्ञान
- पाणी पिऊन किंवा स्नान करून रोगमुक्ती साधणारी उपचार पद्धतीला हायड्रोपथी म्हणतात.
- विजेच्या मूलभूत एककास `इलेक्ट्रॉन' ही संज्ञा जॉर्ज जॉन्स्टन स्टोनी यांनी दिली.
- इग्वाना (घोरपड) पाल प्राणीवर्गात मोडते.
व्यक्ती आणि प्रसंग
- मल्याळम साहित्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलचा एझहुताचन पुरस्कार इ.स. २००० साली पाला नारायणन नायर यांना मिळाला.
- इंदिरा गांधी या भारतीय स्त्रीला `सहस्त्रक पुरंध्री' (वुमन ऑफ द मिलेनियम) हा बहुमान बीबीसीच्या मतगणनेतून मिळाला.
- बांगलादेश हा देश `गंगा मेकांग' गटाचा सभासद नाही.
No comments:
Post a Comment